Followers

Saturday, 29 July 2017

*वेदमंत्राहून आम्हां वंद्य ’वंदे मातरम्‌’वंद्य वंदे मातरम्‌*

*वेदमंत्राहून आम्हां वंद्य ’वंदे मातरम्‌’वंद्य वंदे मातरम्‌*

माउलीच्या मुक्‍ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ’वंदे मातरम्’

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभे शस्त्र ’वंदे मातरम्’

निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ’वंदे मातरम्‌’

गीतकार: ग.दि.माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक: सुधीर फडके
चित्रपट: वंदे मातरम्‌

सुप्रभात
शुभदिन
*भारत माता की जय*

No comments:

Post a Comment